सध्या सगळीकडे 'अंतरपाट' या मालिकेची चर्चा सुरु आहे. अशातच मालिकेतील गौतमी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली आहे. पाहा फोटो
(1 / 5)
कलर्स मराठी वाहिनीवर 'अंतरपाट' ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहिल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. आता मालिकेतील गौतमी सिद्धिविनायकाच्या चरणी लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी गेली आहे.
(2 / 5)
कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मी अनपट म्हणजेच आपल्या लाडक्या गौतमीचे थोड्याच दिवसांत लग्न होणार आहे.
(3 / 5)
सध्या घरात लग्नाची लगबग सुरु आहे .आता पत्रिका ही आल्या असून पहिली पत्रिका श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांच्या चरणी ठेवून गौतमीने आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याआधी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
(4 / 5)
यावेळी गौतमी आणि तिच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले असून ते अतिशय आनंदी आहे.
(5 / 5)
तुम्ही ही पाहू शकता गौतमीच्या लग्नाची तयारी 'अंतरपाट' मालिकेत.