कुंभमेळ्यात फूल विक्री करणारी तरुणी व्हायरल : कुंभ मेळ्यादरम्यानच, एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने फुले विकणाऱ्या एका तरुणीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून या तरुणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या युझरने या महिलेशी चर्चा केली असून या दरम्यान, ती इंस्टाग्राम वापरत असल्याचं सांगितलं. तिचा व्हिडिओ व फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
(Instagram/shivam_bikaneri_official)तरुणी मध्यप्रदेशातील इंदूरची रहिवासी : या तरुणीने या बोलतांना सांगितले की, ती मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे. ती हार आणि फूल विक्रीचे काम करते. या तरुणीने तिचे नाव सांगितले नाही. व काही वेळातच तेथून निघून गेली.
(Instagram/shivam_bikaneri_official)नेटकऱ्यांनी केली मोनालिसाशी तुलना : फुलांचे हार विकणाऱ्या या तरुणीची तुलना नेटकऱ्यांनी मोनालिसासोबत केली आहे. महाकुंभात पोहोचलेले लोक तिच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. ही तरुणी सुंदर असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
(Instagram/shivam_bikaneri_official)या फुले विकणाऱ्या तरुणीच्या आधी हर्षा रिचारियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिला 'सुंदर' साध्वी म्हटलं जात होतं. दरम्यान, तिने एका मुलाखतीत स्वतः स्पष्ट केले की ती साध्वी नाही तसेच तिने संन्यास घेतलेला नाही. ती उत्तराखंडची आहे आणि सुमारे २ वर्षांपासून अध्यात्माशी जोडलेली आहे.
(Instagram/shivam_bikaneri_official)सोशल मीडियावर सक्रिय : हर्षा रिचारिया हिने तिची नवी ओळख तयार करण्यासाठी आध्यात्म स्वीकारलं. या साठी तिने सर्वस्व सोडल्याचे देखील तिने मुलाखतीत सांगितलं. ती आचार्य महामंडलेश्वरांची शिष्या असल्याचं सांगते. ती सोशल मीडिया आणि इतर कार्यक्रमात देखील बरीच सक्रिय असते.
(Instagram/shivam_bikaneri_official)