Ankita-Vicky Relationship: ‘बिग बॉस १७’च्या प्रवासात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
(1 / 6)
‘बिग बॉस १७’च्या प्रवासात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या दोघांमध्ये दररोज इतके वाद होतात की, शोमध्येच त्यांचे नाते तुटेल अशी भीती चाहत्यांनाही वाटते आहे.(All Photos: Instagram)
(2 / 6)
आता आगामी भागात देखील दोघांमधील बेबनावाची झलक पाहायला मिळणार आहे. शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अंकिता आणि विकी एकत्र बसून बोलताना दिसले होते. यावेळी अंकिता लोखंडे तिच्या मनातील खदखद आणि राग व्यक्त करताना दिसली आहे.
(3 / 6)
मात्र, पुन्हा एकदा यामुळे वाद होताना दिसणार आहे. अंकिताचं काही बोलणं ऐकून विकी तिला काहीबाही बोलणार आहे. यावरून अंकिता विकीला ‘माझ्यापासून ब्रेक घे’ असा सल्ला देताना दिसणार आहे. विकीला हे ऐकून आश्चर्य वाटणार आहे.
(4 / 6)
आता विकी खरच अंकितापासून ब्रेक घेईल आणि दोघेही वेगळे होतील का? हे येणारा काळच सांगणार आहे. सासूच्या बोलण्याने अंकिता खरंतर खूप दुःखी झाली आहे. नुकत्याच शोमध्ये आलेल्या विकीच्या आईने अंकितावर चांगलीच आगपाखड केली आहे.
(5 / 6)
विकी जैनच्या आईने अंकिता लोखंडे हिच्यावर अनेक आरोप लावले आहेत. यात त्यांनी अंकिताच्या आई वडिलांचं नाव देखील घेतलं. यामुळे अंकिता आणखीनच भडकली आहे.
(6 / 6)
विकी जैन याच्या आईच्या येण्याने आता विकी आणि अंकिता यांच्या नात्यातील तेढ आणखीनच वाढले आहेत. दोघेही एकमेकांशी सतत वाद घालताना दिसत आहेत.