Anil Kumble Photography : क्रिकेटच्या मैदानावर गुगली टाकून प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा अनिल कुंबळे कॅमेराही तितक्याच सहजतेनं हाताळतो. त्यानं क्लिक केलेले फोटो पाहून तुम्ही चकीत व्हाल!
(1 / 12)
अनिल कुंबळे हा पर्यावरणप्रेमी आहे. जंगलात भटकंती करणे हा त्याचा छंद आहे. भारतातील प्रमुख जंगले आणि टेकड्यांवर फिरताना त्याच्या हातात नेहमीच कॅमेरा असतो. अनिल कुंबळेनं फोटोग्राफर म्हणून निसर्गातील अनेक उत्कृष्ट क्षण टिपले आहेत.
(2 / 12)
जंगलात फिरताना वाघ क्वचितच दिसतो, मात्र, एकाच फ्रेममध्ये चार वाघ टिपायला मिळाले तर. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात फिरताना अनिल कुंबळे यांनी ही किमया केली होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी अनिल कुंबळे यांना हा पुरस्कार मिळाला होता.
(3 / 12)
जंगल सफारी करताना एकतरी वाघ दिसावा अशी प्रार्थना वन्यजीव प्रेमी करत असतात. अनिल कुंबळेला फक्त वाघ दिसलेच नाही टिपताही आले. अनिल कुंबळेनं बांदीपूरमध्ये टिपलेलं ऐटदार वाघाचं हे छायाचित्र.
(4 / 12)
हत्तीला पाण्यात जास्त रमताना दिसतात. पावसात भिजण्याचा आनंद घेतात. पावसाचा आनंद घेणाऱ्या अशाच एका हत्तीचं अनिल कुंबळेनं टिपलेलं छायाचित्र.
(5 / 12)
बिबट्या हा झाडावर लपून बसणारा लाजाळू आणि सतत लपून राहणारा प्राणी आहे. मात्र तो समोर आला तर काळजाचं पाणी झाल्याशिवाय राहत नाही. एखाद्या शिकारीकडं रोखून बघावं तशा भेदक नजरेनं बघणाऱ्या बिबट्याचं अनिल कुंबळेनं टिपलेलं छायाचित्र.
(6 / 12)
वाघ आणि बिबट्यानंतर शिकार करण्यात नंबर लागतो तो ढोले या प्राण्याचा. त्यांची तीक्ष्ण नजर आणि वेग पकडणं खूपच कठीण असतं. अनिल कुंबळेनं एखाद्या फलंदाजाला बेसावध गाठावा तसं या ढोल्याला कॅमेऱ्यात पकडलं आहे.
(7 / 12)
हरीण हा जंगलातील सर्वात गरीब प्राणी. बहुतेक मोठ्या जनावरांची मुख्य शिकार हाच प्राणी असतो. अनिल कुंबळेनं कॅमेऱ्यात टिपलेलं हे भेदरलेलं सावज.
(8 / 12)
जंगलात नाचणारा मोर हा सगळ्यांच्याच आवडीचा असतो. पण हा मोर जणू फोटोसाठी पोज देत आहे. अनिल कुंबळेनं टिपलेलं हे मोहक छायाचित्र पाहत राहावं असं आहे.
(9 / 12)
स्वत:साठी व आपल्या पिलांसाठी पक्षांनी घरटं बांधणं हा निसर्गातील एक वेगळाच सोहळा असतो. एखाद्या कसबी कलाकाराप्रमाणे पक्षांनी बांधलेलं घरटं आपण अनेकदा पाहिलं असेल. मात्र, हे घरटं उभारण्यासाठी त्यांना अनेक प्रकारची जमवाजमव करावी लागते. अशाच एका घरट्यासाठी पान उचलताना अनिल कुंबळेनं टिपलेलं एका पक्ष्याचं छायाचित्र.
(10 / 12)
साहसाची तुलना आपण नेहमी गरुडाशी करतो. एखाद्यानं मोठं यश मिळवल्यास त्याला गरुडझेपेची उपमा देतो. मात्र, प्रत्यक्षात हा गरुड जंगलात गरुड पाहायला मिळणं दुर्मिळ असतं. अनिल कुंबळेला हे भाग्य लाभलं. राखाडी डोक्याचा फिश गरुड अनिलनं आपल्या कॅमेऱ्यात टिपला.
(11 / 12)
पाणी हे केवळ मनुष्यासाठीच नव्हे तर अखिल सृष्टीसाठी जीवन आहे. पाण्याच्या सहवासात प्रत्येक जीव आनंदून जातो. पाण्यात स्वछंद विहार करणाऱ्या बदकाचं अनिल कुंबळेनं टिपलेलं हे छायाचित्र.
(12 / 12)
अनिल कुंबळेला अशा प्रकारे सफारीला जायला आवडतं. तो मित्र परिवारासोबत जंगलात फिरतो. अलीकडंच तो वरिष्ठ आयएएस अधिकारी पंकज कुमार पांडे यांच्यासोबत बांदीपूर अभयारण्यात गेला होता.