बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच तिने एका कार्यक्रमातील काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमधील अनन्या पांडेचा देसी पारंपारिक लूक खूपच जबरदस्त दिसत होता.
(All Photos : Instagram)या फोटोंमध्ये अनन्या पांडे पिवळ्या रंगाच्या साडीत बाल्कनीजवळ बसून सुंदर फोटो पोझ देताना दिसत आहे.
या दुसऱ्या फोटोत अभिनेत्री अनन्या पांडे भाषण करताना दिसत आहे. अनन्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
अनन्या पांडेने तिच्या कानांमध्येमध्ये स्टेटमेंट इअररिंग्स घातले आहेत. तर, नेक पीस, अंगठ्या आणि फुलांसह तिने तिचा हा लूक पूर्ण केला.
अनन्याचे लाखो चाहते या सुंदर फोटोंवर भरभरून कमेंट करताना दिसत आहे. ‘सुंदर’, ‘जबरदस्त’, ‘पिवळ्या रंगात सुंदर’, ‘सो सो गॉर्जियस’ आणि ‘परम सुंदरी’ अशा कमेंट्स यावर पाहायला मिळत आहेत.