अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. या सेलिब्रेशनमध्ये सिनेकलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला बॉलिवूडच्या काही अभिनेत्री साड्या परिधान करून उपस्थित होत्या. यावेळी त्या स्टनिंग लूकमध्ये दिसल्या.
(Instagram)बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण जांभळ्या रंगाच्या साडीत अधिकच सुंदर दिसत होती. गरोदर असलेली दीपिका ही साडी परिधान करून बेबी बंप फ्लाँट करत सोहळ्यात आली होती. आपल्या स्टनिंग लूकमुळे ती संगीत सोहळ्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती.
(Instagram/@deepikapadukone)खुशी कपूरने गुलाबी रंगाची मॉडर्न साडी आणि फुल स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला होता. यावेळी तिने कॅमेरासाठी आकर्षक पोझ दिल्या होत्या.
(Instagram/@khushi05k)बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या शिमरी साडीत झळकली. ऑफ शोल्डर ब्रालेट स्टाईल ब्लाऊज परिधान करून ती हॉट दिसत होती. मॉडर्न स्टाईलच्या साडीत अनन्या सुंदर दिसत होती.
(HT photo/VarinderChawla)आकर्षक साडीत चमकली शहजान गिल! चमकदार सोनेरी साडीत ही अभिनेत्री ग्लॅमरस दिसत होती.
(HT Photo/Varinder Chawla)ब्राऊन साडीमध्ये मौनी रॉय ग्लॅमरस दिसत होती. अभिनेत्री शिमरी साडी आणि ब्रालेट ब्लाऊजमध्ये ग्लॅमरस दिसत होती.
(HT photo/VarinderChawla)बॉलिवूडची हॉट ब्युटी दिशा पाटणी गोल्डन साडीमध्ये मंत्रमुग्ध करत होती. तिने स्वीट हार्ट नेटलाइन ब्लाउज परिधान केला होता आणि तिच्या मॉडर्न लूकचा जलवा दाखवला.
(HT photo/VarinderChawla)बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितही गोल्डन कलरच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. शिमरी पॅटर्नच्या साडीत ती अधिकच ग्लॅमरस दिसत होती.
(HT photo/VarinderChawla)