Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू आहे. यासाठी जगभरातील सर्व बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत. आता या प्री-वेडिंग सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत.
(1 / 5)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेरिमनीसाठी जगभरातील मोठे स्टार जामनगरमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये मोठे उद्योगपती, गायक, राजकीय नेते आणि दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या प्री-वेडिंग सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत.(PTI)
(2 / 5)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेरिमनीसाठी बॉलीवूड सेलिब्रिटींपासून क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. (PTI)
(3 / 5)
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारपासून ते फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गपर्यंत सर्व दिग्गज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात दिसले.(PTI)
(4 / 5)
वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होही प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये दिसला. ब्राव्होसोबत त्याची गर्लफ्रेंडही या शानदार सोहळ्याला उपस्थित होती. दोघेही खूपच सुंदर दिसत होते. (PTI)
(5 / 5)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये एमएस धोनी पत्नी साक्षीसोबत दिसला. यावेळी दोघेही अतिशय देखणे दिसत होते. काळ्या रंगाच्या सूटमध्ये माही छान दिसत आहे. तर साक्षीही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होते.