गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये वधू-वर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांच्या लूकचीही खूप चर्चा झाली होती.
तर, नीता अंबानी यांनी प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये गडद जांभळ्या रंगाचा लाँग गाऊन परिधान केला होता. यासोबत त्यांनी हाय बन हेअरस्टाईल करून तिचा हा लूक पूर्ण केला होता.
अनंत अंबानीचे वडील म्हणजेच मुकेश अंबानी यांनीही या कार्यक्रमात काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून एन्ट्री घेतली होती.
बहीण ईशा अंबानी हिने या प्री वेडिंग सोहळ्यासाठी पेस्टल रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. यासोबत ईशाने हेवी नेकपीस घालून तिचा लूक पूर्ण केला.
भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षी धोनीसोबत प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये पोहोचला होता. या इव्हेंटमध्ये साक्षीने ब्लॅक नेट साडीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सैफ अली खान आणि करीना कपूर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या परी वेडिंग कार्यक्रमात पोहोचले होते.