बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री एमी जॅक्सन हिने तिचा बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत साखरपुडा केला आहे. दोघेही गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. एमीने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
(All Photos: @iamamyjackson/IG)या रोमँटिक फोटोंमध्ये एमी आणि तिचा प्रियकर एड बर्फाच्छादित पर्वतांमध्ये बांधण्यात आलेल्या एका पुलावर आहेत. या सुंदर खोऱ्यांमध्ये एडने एमीला प्रपोज केले आणि तिला अंगठी दिली.
एडने स्वित्झर्लंडमध्ये एमी जॅक्सन हिला प्रपोज केले आहे. तर, एमीने देखील या प्रपोजला लगेच होकार दिला आहे.याची माहिती देखील तिने या फोटोंमधून दिली.
या फोटोंमध्ये एड आणि एमी स्वित्झर्लंडमधील एका पुलावर उभे आहेत. एमीने पांढरे जॅकेट आणि पांढरी पँट घातली आहे. तर, एड ग्रे जॅकेट आणि कार्गोमध्ये आहे. तो गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला प्रपोज करत आहे.