अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा शो प्रेक्षकांना खूप आवडत आहे. हा शो प्रेक्षकांचे प्रबोधन तर करतच आहे. शिवाय 'बिग बीं'च्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील रंजक किस्सेही यात ऐकायला मिळत आहेत. आता नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये बिग बी जया बच्चन यांच्याबद्दल बोलले.
या भागात प्रियांका नावाची स्पर्धक शोमध्ये आली होती, जिने मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्रश्न अमिताभ बच्चन यांना विचारले. बिग बीही तिच्या प्रश्नांना अतिशय गंमतीशीर उत्तर देताना दिसले. प्रियांकाने बिग बींना विचारलं की, तुमचं घर इतकं मोठं आहे, रिमोट हरवला तर तो कसा शोधता? यावर बिग बी म्हणतात की, ते थेट सेट टॉप बॉक्सजवळ जाऊन त्यावरील बटणांवरुन कंट्रोल करतात.
त्यानंतर प्रियांका म्हणते की, मध्यमवर्गीय कुटुंबात रिमोट हरवला की, घरात भांडण होते. तुमच्या घरातही असंच घडतं का? यावर बिग बी म्हणतात की, नाही देवीजी, आमच्या घरात असं होत नाही. सोफ्यावर दोनच उशा आहेत, त्यात रिमोट लपलेला आहे. त्यातच शोधावं लागतं.
प्रियांका पुढे म्हणते की, मी ऑफिसमधून घरी येत असताना आई म्हणते कोथिंबीर आण, आणखी काही सामानाची यादी देते. जया मॅम तुलाही काही आणायला सांगतात का? यावर बिग बी म्हणतात की, हा त्याही सांगतात की,येताना स्वतःला घरी घेऊन या.
शेवटी प्रियांका विचारते की सर, तुम्ही कधी एटीएममध्ये जाऊन कॅश काढली आहे का आणि बॅलन्स चेक केला आहे का? बिग बी म्हणतात की, नाही. मी माझ्याकडे थोडीशी कॅश ठेवतो. पण, कधीच एटीएममध्ये गेलो नाही. कारण, ते कार्ड कसं वापरायचं ते मला समजत नाही. पण, जयाजींकडे आहे. मी त्यांच्याकडे पैसे मागतो.
(AFP)