Year Ender 2024 : या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, तर काही अभिनेत्यांनी कोट्यवधींची आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत.
(1 / 8)
२०२४ मध्ये अनेक कलाकारांनी मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांची किंमतही करोडोंमध्ये आहे. स्टार्सनी या वर्षी प्रॉपर्टीमध्ये भरपूर पैसे गुंतवले आहेत. या वर्षी कोणी प्रॉपर्टी खरेदी केली आणि त्यांची किंमत काय होती ते जाणून घेऊया…(instagram)
(2 / 8)
सप्टेंबरमध्ये अमिताभ बच्चन यांनी इटर्नियामध्ये २.५४ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. रिपोर्टनुसार, त्यांनी १४.२३ लाख रुपये मुद्रांक शुल्कही भरले होते.(instagram)
(3 / 8)
अभिषेक बच्चनने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच इमारतीत २.२२ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. त्याने मुद्रांक शुल्कापोटी १३.३३ लाख रुपये भरले होते.(instagram)
(4 / 8)
आमिर खानने या वर्षी जूनमध्ये वांद्रे येथे मालमत्ता खरेदी केली होती. स्क्वेअर यार्डच्या रिपोर्टनुसार, आमिरने ९.७५ कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली होती.(instagram)
(5 / 8)
शाहिद कपूरने मे महिन्यात ओबेरॉय रिॲलिटीमध्ये ५८.६६ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती.(instagram)
(6 / 8)
तृप्ती डीमरी गेल्या काही काळापासून एकापाठोपाठ एक मोठे चित्रपट करत आहेत. अभिनेत्रीने यावर्षी १४ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे, ज्यासाठी तिने ७० लाख रुपये मुद्रांक शुल्क देखील भरले आहे.(instagram)
(7 / 8)
या वर्षी खासदार झालेल्या कंगना रणौतने १.५६ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. त्यासाठी तिने ९.३ लाख रुपये मुद्रांक शुल्कही भरले.(instagram)
(8 / 8)
सुनील शेट्टीने ऑक्टोबरमध्ये मुलगा अहान शेट्टीसोबत वांद्रे येथे एक मालमत्ता खरेदी केली होती, ज्याची किंमत ८.२ कोटी रुपये आहे. या मालमत्तेसाठी त्यांनी ४०.८ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले होते.(instagram)
(9 / 8)
जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर यांनीही ६३ लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. त्यासाठी त्यांनी ३.७ लाख रुपये मुद्रांक शुल्कही भरले.(instagram)