अमिताभ बच्चनपासून ते आलिया भट्टपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपली छाप सोडली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे हे चित्रपट कुठे पाहता येतील हेही जाणून घ्या…
अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट केले आहेत. यासोबतच त्यांनी 'द ग्रेट गॅट्सबी' या हॉलिवूड चित्रपटातही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. हा चित्रपट २०१३साली प्रदर्शित झाला होता. प्राइम व्हिडिओवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
इरफान खान हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक होता. इरफानने २०२०मध्ये जगाचा निरोप घेतला. इरफान आज या जगात नसला, तरी त्याचे चाहते त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा बघायला सगळ्यांनाच आवडतात. आपल्या कारकिर्दीत इरफान खानने ‘लाइफ ऑफ पाय’ (हॉटस्टारवर पाहता येईल), ‘जुरासिक वर्ल्ड’ (जिओ सिनेमा आणि प्राइम व्हिडिओ) आणि ‘इन्फर्नो’ (नेटफ्लिक्स) या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
प्रियांका चोप्राला बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिने बॉलिवूड, तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्येही अद्भुत कामगिरी केली आहे. तिने हॉलीवूड सीरिज सिटाडेल (प्राइम व्हिडिओ), द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स (नेटफ्लिक्स) आणि बेवॉच (नेटफ्लिक्स) सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांवर जादू करण्यासोबतच आलिया भट्टने ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. हा एक अमेरिकन गुप्तहेर चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
८० आणि ९०च्या दशकात डिंपल कपाडियाने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपली अप्रतिम प्रतिभा दाखवली. त्या अजूनही बॉलिवूडचा एक भाग आहेत. ‘टेनेट’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा ‘एक्सट्रॅक्शन’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहू शकता.