बॉलिवूड चित्रपटांमध्ये आजच नाही तर सुरुवातीपासूनच इंटिमेट सीन्स पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या कथेनुसार सीन शूट केले जातात. परंतू तरुण कलाकारांनी दिलेल्या इंटिमेट सीनची नेहमीच चर्चा होते. पण काही कालाकारांनी म्हातारपणी बोल्ड सीन्स दिले. हे सीन्स पाहून सर्वजण चकीत झाले. चला जाणून घेऊया या कलाकरांविषयी…
या यादीत अमिताभ बच्चन यांचेही नाव आहे. 'निः शब्द' चित्रपटात अमिताभ १९ वर्षीय अभिनेत्री जिया खानच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी बिग बी ६५ वर्षांचे होते.
या यादीत ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचाही समावेश आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील डीप लिप-लॉकची बरीच चर्चा झाली होती. यावरून बराच वाद झाला होता.
बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफनेही नीना गुप्तासोबत 'खुजली' चित्रपटात रोमान्स केला होता. त्यांच्या या रोमँटिक सीनची जोरदार चर्चा रंगली होती.