बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील. तुम्हाला ते चित्रपट खूप आवडले असतील, पण आज आम्ही तुम्हाला अमिताभ यांच्या त्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे कधीही प्रदर्शित झाले नाहीत.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी पहिल्यांदा दुलाल गुहा यांच्या 'दो अंजाने' या चित्रपटात दिसली होती. पण, तुम्हाला माहीत आहे का की, या चित्रपटापूर्वी देखील अमिताभ आणि रेखा एका चित्रपटात काम करत होते. मात्र, अमिताभ यांचा तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नव्हता. अमिताभ यांच्या चित्रपटाचे नाव 'अपना पराया' असे होते.
अमिताभ बच्चन आणि सुजित सरकार 'शुबाइट' या चित्रपटावर एकत्र काम करत होते. परंतु मीडिया रिपोर्ट नुसार, काही कायदेशीर कारणांमुळे चित्रपट स्थगित करण्यात आला होता.
'एक था चंदेर एक थी सुधा' या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा एकत्र दिसणार होते, मात्र पैशांअभावी हा चित्रपट थांबवावा लागला होता.
अमिताभ बच्चन यांच्या 'सरफरोश' या चित्रपटात परवीन बाबी, कादर खान आणि शक्ती कपूर एकत्र येणार होते, पण हा चित्रपट रखडला होता. हा चित्रपट का बंद झाला याचे कारण मीडियाला कळू शकलेले नाही.
माधुरी दीक्षित अमिताभ बच्चन यांच्या 'संकट' चित्रपटात दिसणार होती. त्याने काही भागांचे चित्रीकरणही केले होते, पण नंतर काही कारणांमुळे तो चित्रपट थांबवण्यात आला.
'आलिशान' हा चित्रपट आठवडाभराच्या शूटिंगनंतर रखडला होता. नंतर, अमिताभ बच्चन इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्यामुळे चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.