(4 / 5)ऑनर २०० 5G: हा फोन २४ हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा कर्व्ड एमोलेड डिस्प्ले असून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिपसेटसह सुसज्ज आहे. फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात ड्युअल ओआयएससह ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये १०० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार २०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.