रामनगरी लाखो दिवे व लेझर शो मुळे उजळून निघाली. भगवान श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. शरयूच्या ५५ घाटांवर एकाच वेळी २८ लाख दिव्यांची रोषणाई करुन 'राम की पाडी' उजळून निघाली आहे.
(अयोध्या)संपूर्ण अयोध्येत ३५ लाख दिवे प्रज्वलित केले असून केवळ शरयू घाटावर २५ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. विशेष म्हणजे, तब्बल ५०० वर्षांनंतर पहिल्यांदाच अयोध्येतील लोक रामललाच्या उपस्थितीत दिवाळी साजरी करत आहेत. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राम की पाडीसह ५५ घाट २५ लाख दिव्यांनी उजळून निघाले.
रामपथ, धर्मपाठ आणि शरयू नदीलगतचा परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी, आणि लेझरच्या प्रकाश झोतांनी न्हावून निघाला. शरयूच्या सर्व ५५ घाटांवर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी लेझर शो, ड्रोन शो, फटाक्यांची आतषबाजी हे मुख्य आकर्षण होते.
अयोध्येतील ५५ घाटांवर दीप प्रज्वलित करण्यात आले. दीपोत्सवात विक्रमी 25 लाख 12 हजार 585 दिवे लावून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. हे अनोखे दृष्य पाहण्यासाठी शरयूच्या दोन्ही बाजूला हजारो लोक जमले होते.
रंगीबेरंगी रोषणाईत राम की पाडी उजळून निघाली. शरयूच्या दुतर्फा जमलेल्या हजारो लोकांनी दीपोत्सवाचा अनोखा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
अयोध्येचा दीपोत्सव पाहण्यासाठी लोकांची गर्दी होती. साकेत कॉलेज ते रामकथा पार्क म्हणजेच रामपथ हा संपूर्ण रस्ता सकाळी पाण्याने धुवून स्वच्छ केला होता.
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतरची पहिली दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दीपोत्सवाच्या आठव्या पर्वासाठी रामनगरी अनेक दिवसांपासून सज्ज झाली होती.
अयोध्येत दीपोत्सवानिमित्त लेझर शो चे आयोजन करण्यात आले होते. डोळ्याचे पारणे फेडणाऱे लेझऱ शो पाहण्यासाठी लोकांची गर्दी होती. साकेत कॉलेज ते रामकथा पार्क पर्यंत मिरवणूक काढण्यात आली असून १८ विशेष देखावे हे या दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण होते.