(4 / 6)चैत्र अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग आणि सौभाग्य योग जुळून येतात. सर्वार्थ सिद्धी योग दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होईल आणि ८ मे रोजी पहाटे ५ वाजून ३४ मिनिटापर्यंत राहील. सौभाग्य योग ७ मे रोजी रात्री ८ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि ८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिटापर्यंत राहील, त्यानंतर शोभन योग सुरू होईल, जो रात्रीपर्यंत राहील.