मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ‘अल्याड पल्याड’ सिनेमात अभिनेते मकरंद देशपांडे यांची वर्णी, साकारणार वेगळी भूमिका

‘अल्याड पल्याड’ सिनेमात अभिनेते मकरंद देशपांडे यांची वर्णी, साकारणार वेगळी भूमिका

May 06, 2024 02:15 PM IST Aarti Vilas Borade

  • ‘अल्याड पल्याड’ हा एक थरारपट आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. या अवलिया कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेविषयी रसिकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. आता त्यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

‘अल्याड पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटात मकरंद देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

आपला महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती, तसेच प्रथा, परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा  ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाविषयी बोलताना मकरंद देशपांडे म्हणाले, ‘आव्हानात्मक भूमिका करायला मला नेहमीच आवडतात.‘अल्याड पल्याड’ मधली भूमिका एका मांत्रिकाची आहे, त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त नाही,त्यातून तो त्या गावाला कसा वाचवणार? याची अतिशय थरार गोष्ट यात मांडलीय.   प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच  खिळवून  ठेवेल यात शंका नाही.’
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज