सध्या 'पुष्पा २ द रूल' या चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटणारा अल्लू अर्जुनही मोठ्या अडचणीत सापडला आहे. हैदराबादच्या चित्रपट गृहातील चेंगराचेंगरी आणि एका महिलेचा मृत्यू यामुळे खळबळ उडाली आहे. मंगळवारी पोलिसांनी अल्लूला चौकशीसाठी बोलावले आणि तब्बल अडीच तास त्याची चौकशी केली. आता बातमी येत आहे की, चौकशीदरम्यान अल्लू भावूक झाला होता.
(PTI)एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अल्लूला हैदराबाद पोलिसांच्या दाव्याबद्दल विचारण्यात आले. अल्लूला विचारण्यात आलं की, 'तुला माहित आहे का की, पोलिसांनी तुला प्रीमिअरला येण्याची परवानगी नाकारली होती?' पोलिसांची परवानगी नसतानाही तिथे जाण्याचा बेत कोणी आखला? चित्रपटगृहाबाहेर काय चालले आहे आणि त्या महिलेच्या मृत्यूची माहिती तुम्हाला कधी कळली? हे कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले होते का?
(PTI)मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हे प्रश्न विचारताच अल्लू अर्जुन भावूक झाला होता. यावेळी चेंगराचेंगरीचा व्हिडिओ अल्लूला दाखवण्यात आला आणि व्हिडिओमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलेची आणि तिच्या मुलाची अवस्था पाहून तो भावूक झाला होता.
(PTI)'पुष्पा २'चा प्रीमियर संध्या थिएटरमध्ये झाला होता. अभिनेता सरप्राईज देण्यासाठी तेथे पोहोचला आणि चाहत्यांना अभिनेत्याच्या आगमनाची माहिती मिळताच तिथे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून, तिच्या मुलाची प्रकृती अजूनही गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(ANI)