पुढील बातमी

PHOTO: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले

HT मराठी टीम , मुंबई
मुंबई पाऊस
मुंबई शहरासह उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. माटुंगा, दादर, परेल, हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे. (फोटो सौजन्य: भूषण कोयंडे/ हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
पावसामुळे दादर, परेल परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. (फोटो सौजन्य: भूषण कोयंडे/ हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
पावसामुळे दादर, परेल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दादर येथील पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. (फोटो सौजन्य: भूषण कोयंडे/ हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
मुंबईत सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे भांडूप परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. (फोटो सौजन्य: सतिश बाटे/ हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
अंधेरी, जोगेश्वरी परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत चालक गाड्या चालवत आहेत. (फोटो सौजन्य: राहुल क्रिश्नन/ हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे गाड्या बंद पडत आहे. अंधेरी येथे बंद पडलेली रिक्षा दुरुस्ती करताना रिक्षा चालक. (फोटो सौजन्य: राहुल क्रिश्नन/ हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
पावसामुळे सांताक्रुझ येथील मिलन सबबे जवळ कमरे इतके पाणी साचले आहे. आसपासच्या दुकानामध्ये पाणी शिरले आहे. याठिकाणी वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: प्रमोद ठाकूर/ हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल थांबवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: प्रफुल्ल गांगुर्डे/ हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
पावसामुळे लोकलसेवा ठप्प झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. (फोटो सौजन्य: प्रफुल्ल गांगुर्डे/ हिंदुस्थान टाइम्स)