पुढील बातमी

Photos of the week: पाहा जगभरातले भन्नाट फोटो एका क्लिकवर

HT मराठी टीम , मुंबई
जगभरातले भन्नाट फोटो
जपानमधील गोटोकुजी देवळातला हा फोटो आहे. या मंदिरात मांजरीच्या आकारातले पुतळे ठेवले जातात. असं केल्यानं भरभराट होते अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. (छाया सौजन्य : AP)
जगभरातले भन्नाट फोटो
उष्णतेमुळे पक्षांना त्रास होत आहे. फ्रान्समधील एका पशूवैद्यकीय रुग्णालयात या पक्षांची काळजी घेतली जात आहे. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
मॅक्सिकोच्या भिंतीकडून सुरक्षारक्षक पहारा देत आहे. अनेक निर्वासित या बाजूनं अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सिमेवर पहारा वाढवण्यात आला आहे. (छाया सौजन्य : REUTERS )
भन्नाट फोटो
फ्रान्समधील एका कलाकारानं वापरात नसलेल्या बसचं रुपडं पूर्णपणे पालटलं आहे. या बसला त्यानं स्विमिंग पूलचं रुप दिलं आहे. (छाया सौजन्य : REUTERS )
जगभरातले भन्नाट फोटो
चीनमधील पिंगझिंग भागात पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती आहे. (छाया सौजन्य : REUTERS )
जगभरातले भन्नाट फोटो
इस्राईलच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेत आहेत. (छाया सौजन्य : REUTERS )