पुढील बातमी

Valentine Day : एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कलाकार

HT मराठी टीम , मुंबई
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कलाकार
'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्तानं आपण मराठी सिने, नाट्य आणि मालिकासृष्टीत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊ
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कलाकार
प्रिया मराठे आणि शांतनु मोघे हे मराठीसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्यापैकी एक. प्रियानं अनेक मालिकांत काम केलं आहे तर शांतनु त्यानं साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कलाकार
अभिजीत खांडकेकर आणि सुखदा हे देखील मराठी मनोरंजन विश्वातील 'मेड फॉर इच अदर' जोडी आहे.
 सिद्धार्थ- मिताली
तरुणांमध्ये सिद्धार्थ- मिताली जोडी खूपच लोकप्रिय आहे. या दोघांनी गेल्यावर्षी साखरपुडा केला. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
ईशा केसकर
'जय मल्हार', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील ईशा केसकर आणि 'काहे दिया परदेस' मधला ऋषी सक्सेना ही जोडी खूपच लोकप्रिय आहे. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ ते दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
श्वेता मेहंदळे आणि राहुल मेहंदळे
श्वेता मेहंदळे आणि राहुल मेहंदळे हे सेलिब्रिटी कपल सध्या एका वाहिनीवरील दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करत आहे.
प्रिया आणि उमेश
रुपेरी पडद्यावर आणि प्रत्यक्षातही प्रिया आणि उमेशची जोडी मराठी प्रेक्षकांच्या खूपच आवडीची आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
सखी- सुव्रत जोशी
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या मालिकेनंतर दोघंही विवाहबंधनात अडकले. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)