पुढील बातमी

मोदी-ट्रम्प यांच्यातील आतापर्यंतची चौथी बैठक

HT मराठी टीम, नवी दिल्ली
मोदी-ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी द्विपक्षीय चर्चा झाली. पाकिस्तानकडून काही ठोस पावले उचलण्यात आली तरच भारत त्यांच्यासोबत चर्चेचा विचार करेल, असे मोदींनी स्पष्ट केले. (Photo-AFP)
मोदी-ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दुसऱ्या कार्यकाळातील पहिली तर आतापर्यंतची चौथी बैठक आहे. (Photo-AFP)
मोदी-ट्रम्प
मोदी यांनी ट्रम्प यांना सहकुटुंब भारत दौऱ्यावर येण्याचे निमंत्रणही दिले. (Photo-AFP)
मोदी-ट्रम्प
या बैठकीत मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत काश्मीर संदर्भातील भारतासमोरील आव्हानासंदर्भात ट्रम्प यांना सविस्तर माहिती दिली. (Photo-AFP)
मोदी-ट्रम्प
पठाणकोटच्या हवाईतळावरील हल्ल्यातील दोषींवर पाकिस्तानने अद्यापही कारवाई केलेली नाही, हा प्रश्न देखील मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर उपस्थित केला आहे. (Photo-AFP)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:us president donald trump and indian prime minister narendra modi hold a meeting at un headquarters