पुढील बातमी

PHOTO: शाळेत पाणी पिण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळतो ब्रेक

लाईव्ह हिंदुस्थान , कर्नाटक
शाळेत वॉटर ब्रेक
शाळेत अभ्यास करत असताना विद्यार्थी नेहमी पाणी कमी पितात. तेलंगणा सरकारने यासाठी 'वॉटर बेल' या उपक्रमाला सुरुवात केली आहे. जेणेकरून विद्यार्थी पुरेसे पाणी पितील आणि निरोगी राहतील. (फोटो सौजन्य: एएफपी)
शाळेत वॉटर ब्रेक
तेलंगणा सरकारने आता शाळांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी “वॉटर बेल” सुरू केली आहे. यामुळे बेल वाजवून मुलांना पाणी पिण्याचे संकेत दिले जातात. (फोटो सौजन्य: एएफपी)
शाळेत वॉटर ब्रेक
मुलांच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य राहावी यासाठी तीन वेळा पाणी पिण्यासाठी विद्यार्थ्यांना ब्रेक दिला जातो. (फोटो सौजन्य: एएफपी)
शाळेत वॉटर ब्रेक
दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी १०.४५, दुपारी १२ आणि २ वाजता मुलांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाते. (फोटो सौजन्य: एएफपी)
वॉटर बेल
हैदराबादमधील एका शाळेमध्ये वॉटर बेल दरम्यान पाणी पिताना विद्यार्थी. (फोटो सौजन्य: एएफपी)
वॉटर बेल
कर्नाटकमधील इंद्रप्रस्थ शाळेमधील विद्यार्थी वॉटर बेल दरम्यान पाणी पिताना. (फोटो सौजन्य: एएफपी)
वॉटर बेल
वॉटर बेल झाल्यानंतर स्वत: शिक्षक विद्यार्थ्यांना पाणी वाटप करतात. (फोटो सौजन्य: एएफपी)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:telangana government launch of water bell programme to ensure student drink sufficient water