पुढील बातमी

PHOTO: झी मराठीकडून 'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांना खास सरप्राईज

HT मराठी टीम , मुंबई
चला हवा येऊ द्याचे कलाकार
'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांनी महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला आपल्या विनोदातून हसवले आहे.
चला हवा येऊ द्याचे कलाकार
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'मधील विनोदवीरांना वाहिनीकडून एक खास सरप्राईज देण्यात आले आहे.
चला हवा येऊ द्याचे कलाकार
झी मराठी अवॉर्ड्स २०१९च्या मंचावर सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे या विनोदवीरांची भेट त्यांच्या मातोश्रींशी करून देण्यात आली.
चला हवा येऊ द्या
पहिल्यांदाच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची ओळख या कलाकारांच्या आईशी होणार आहे.
चला हवा येऊ द्या कलाकार भारत गणेशपूरे
या विनोदवीरांच्या हस्ते त्यांच्या आईंना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
चला हवा येू द्या कलाकार सागर कारंडे
आपल्या आईच्या तोंडून कौतुक आणि आतापर्यंतच्या संघर्षाची गोष्ट ऐकताना सगळ्यांना हसवणाऱ्या या कलाकारांचे डोळे पाणावले.
चला हवा येऊ द्या कलाकार श्रेया बुगडे
झी मराठी अवॉर्ड्स २०१९ या कार्यक्रमाचे प्रसारण येत्या २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर होणार आहे.
चला हवा येऊ द्या कलाकार
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेल्या ४ वर्षापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:special surprise to chala hava yevu dya artists form zee mararhi channel