पुढील बातमी

होमहवन करून सोनिया गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

वृत्तसंस्था, रायबरेली
सोनिया गांधींनी भरला उमेदवारी अर्ज
रायबरेलीमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्जा आणि होमहवन केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. (PTI Photo)
सोनिया गांधींनी भरला उमेदवारी अर्ज
होमहवन झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना सोनिया गांधी यांनी रोड शो सुद्धा केला. साधारण ७०० मीटरचे अंतर त्यांनी रोड शोच्या माध्यमातून कापले. (PTI Photo)
सोनिया गांधींनी भरला उमेदवारी अर्ज
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा हे सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रायबरेलीमध्ये आले होते. होमहवन करण्यावेळी ते सुद्धा उपस्थित होते. (PTI Photo)
सोनिया गांधींनी भरला उमेदवारी अर्ज
सोनिया गांधी यांच्या रोड शोवेळी मोठा उत्साह दिसत होता. सहभागी झालेले कार्यकर्ते मोठ्यांदा घोषणा देत होते. (PTI Photo)
सोनिया गांधींनी भरला उमेदवारी अर्ज
सोनिया गांधी पाचव्यांदा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या दिनेश प्रताप सिंह यांच्याशी सोनिया गांधी यांचा सामना होणार आहे. (PTI Photo)
सोनिया गांधींनी भरला उमेदवारी अर्ज
रायबरेली काँग्रेसचा गढ मानला जातो. सोनिया गांधी या मतदारसंघातून चारवेळा निवडून आल्या आहेत. (PTI Photo)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sonia gandhi files her nomination from the raebareli parliamentary constituency