पुढील बातमी

मक्याच्या शेतात उतरवले विमान, वैमानिकाने वाचवले २३३ प्रवाशांचे प्राण

HT मराठी टीम, नवी दिल्ली
मक्याच्या शेतात उतरवले विमान, पायलटने वाचवले २३३ प्रवाशांचे प्राण
रशियाची राजधानी मॉस्कोमधील विमानतळावरुन गुरुवारी उड्डाण करताना एका विमानाला पक्ष्यांचा एक थवा धडकला. अनेक पक्षी विमानाच्या इंजिनमध्ये अडकल्याने २३३ प्रवाशांचा जीव संकटात आला होता. अशात पायलटने समयसूचकता दाखवत विमान थेट मक्याच्या शेतात उतरवले. त्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. (RU-RTR Russian Television via AP)
पक्ष्यांचा थवा विमानाला धडकला
रशियन माध्यमांनुसार, यूराल एअरलाइन्सचे विमान एअरबस ३२१ ने गुरुवारी मॉस्कोतील जुकोवास्की विमानतळावरुन क्रिमिया फोरोपोलसाठी उड्डाण घेतले. उड्डाण करतानाच पक्ष्यांचा थवा विमानाला धडकला. विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये अनेक पक्षी फसले. त्यामुळे इंजिन बंद पडले. (RU-RTR Russian Television via AP)
पायलटने समयसूचकता दाखवली
त्यावेळी वैमानिकाने समयसूचकता दाखवत विमान जुकोवास्की विमानतळापासून दूर एका मक्याच्या शेतात उतरवले. (RU-RTR Russian Television via AP)
वैमानिकाला हीरोची उपमा
रशिया माध्यमं आणि प्रवाशांनी वैमानिक दामिर युसुपोव्हला 'हीरो'ची उपमा दिली. दामिर एखाद्या हीरोपेक्षा कमी नाही, त्याने २३३ प्रवाशांना वाचवले, असे लोकांनी म्हटले आहे. तर रशिया माध्यमांनी म्हटले की, इंजिन बंद पडल्याने वैमानिकाने विमान मक्याच्या शेतात उतरवले. हे कौतुकास्पद आहे. (RU-RTR Russian Television via AP)
वैमानिकाची समयसूचकता
मॉस्को येथील विमानतळावरुन उड्डाण करताना पक्ष्यांचा थव्याची विमानाला टक्कर झाली. विमानाच्या इंजिनामध्ये अनेक पक्षी अडकल्यामुळे २३३ प्रवासी संकटात आले होते. त्याचवेळी वैमानिकाने हुशारी दाखवत विमान मक्याच्या शेतात उतरवत प्रवाशांचा जीव वाचवला. (RU-RTR Russian Television via AP)
पक्ष्यांचा थवा कारणीभूत
यूराल एअरलाइन्सचे विमान एअरबस ३२१ ने गुरुवारी मॉस्कोतील जुकोवास्की विमानतळावरुन क्रीमिया फोरोपोलसाठी उड्डाण घेतले. उड्डाण करताच पक्ष्यांच्या थव्याने त्याला धडक दिली. अनेक पक्षी इंजिनमध्ये अडकले. त्यामुळे इंजिन बंद पडले. (RU-RTR Russian Television via AP)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Russian pilot lands plane in corn field after bird hit hailed as a hero