पुढील बातमी

Renault Triber लाँच, किंमत ५ लाखांपेक्षाही कमी

HT मराठी टीम, मुंबई
रेनोची ७ सीटर कार लाँच
रेनोची आगामी एमपीव्ही कार 'ट्रायबर' लाँच झाली आहे. सात सीटरची ही सर्वांत स्वस्त कार असल्याचे मानले जात आहे. याच्या किंमतीकडेही कंपनीने विशेष लक्ष दिले आहे. रेनो क्विड आणि डस्टर दरम्यानचा गॅप ही कार भरुन काढेल, असे कंपनीचे मत आहे. (PTI Photo)
ट्रायबर कारची सुरुवातीची किंमत ४.९५ लाख रुपये आहे
ट्रायबर कारची सुरुवातीची किंमत ४.९५ लाख रुपये (आरएक्सई व्हर्जन) सुरु आहे. त्याचबरोबर ही कार इतर तीन व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सझेड हे तीन व्हर्जन आहेत. त्यांची किंमत क्रमशः ५.४९ लाख, ५.९९ लाख आणि ६.४९ लाख रुपये आहे. (PTI Photo)
दि. १७ ऑगस्टला कारची बुकिंग सुरु
या कारचे बुकिंग यापूर्वीच १७ ऑगस्टला सुरु झाले आहे. ११००० रुपयांबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून ग्राहकांना बुक करता येईल. (Renault Photo)
अत्याधुनिक फिचर्स
Cardekho.com च्या मते रेनो ट्रायबरमध्ये असे अनेक फिचर्स आहेत, जे या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिले गेले आहेत. यामध्ये ८ इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम (अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्राएड ऑटो कनेक्टिविटीसह), सेंटर कूल्ड बॉक्स (रेफ्रिजटर), रिमूव्हेबल थर्ड रो सीट आणि तिन्ही रांगांमध्ये एसी व्हेंट सारख्या फिचर्सचा समावेश आहे. (Renault Photo)
मॉड्यूलर सिटिंग लेआऊट
ट्रायबरचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे मॉड्यूलर सिटिंग लेआऊट. त्यामुळे ट्रायबरच्या तिसऱ्या रांगेच्या सीट्स काढल्यानंतर यामध्ये ६३५ लीटरपर्यंतचा बूट स्पेस मिळतो. (photo-Renault India/Twitter)