पुढील बातमी

रक्षाबंधन: या क्रिकेटपटूंचे बहिणींशी आहे खास नाते

लाईव्ह हिंदुस्थान, मुंबई
भारतीय क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर आहे. १५ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. बहिण-भावाच्या नात्याच्या या सणादिवशी या क्रिकेटपटूंच्या बहिणींना भावाला राखी बांधता येणार नाहीये. या क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिणीवर खूप प्रेम आहे. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)
विराट कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मोठ्या बहिणीचे नाव गरिमा कोहली-ढिंगरा आहे. विराट बहिणीवर खूप प्रेम करतो. तसंच तिच्यासोबतचे फोटो तो नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
शिखर धवन
क्रिकेटपटू शिखर धवनला एक बहिण आहे. शिखरच्या बहिणीचे नाव श्रेष्ठा धवन आहे. दोन वर्षापूर्वी श्रेष्ठाचे लग्न झाले. त्यावेळी शिखरने बहिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
ऋषभ पंत
भारतीय क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या बहिणीचे नाव साक्षी आहे. ऋषभचे बहिणीवर खूप प्रेम आहे. ऋषभ नेहमीच बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
श्रेयस अय्यर
भारतीय क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याच्या बहिणीचे नाव श्रेष्ठा आहे. श्रेष्ठा एक उत्तम डान्सर आहे. ती इन्स्टाग्रामवर तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
युवा क्रिकेटर दीपक चाहर आणि राहुल चाहर
युवा क्रिकेटर दीपक चाहर आणि राहुल चाहर यांच्या बहिणीचे नाव मालती आहे. मालती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. दीपक आणि मालती यांच्यामधील नातं खूप घट्ट असून ते सोशल मीडियावर नेहमी दिसून येते. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
जसप्रित बुमराह
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वीच बहिणीकडून राखी बांधून घेतली. हा फोटा त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याच्या बहिणीचे नाव जुहिका आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:LIVE: प.बंगालमध्ये तृणमूलचे कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांना भिडले