पुढील बातमी

PHOTO: मायदेशी परतलेल्या सुवर्णकन्या पी. व्ही सिंधूवर कौतुकांचा वर्षाव

HT मराठी टीम , मुंबई
पी. व्ही सिंधू
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकवून इतिहास रचणारी भारताची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधू रात्री उशिरा मायदेशी परतली. (फोटो सौजन्य: पीटीआय)
पी. व्ही सिंधू
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पी. व्ही सिंधूचे आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. तिला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य: पीटीआय)
पी. व्ही सिंधू
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधुने जपानच्या नोझोमी ओकुहारा हिला २१-७, २१-७ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. (फोटो सौजन्य: पीटीआय)
पी. व्ही सिंधू
मायदेशी परतल्यानंतर पी. व्ही सिंधूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. दोघांनी तिचे अभिनंदन केले. (फोटो सौजन्य: एएनआय)
पी. व्ही सिंधू
यावेळी मोदींनी सांगितले की,'भारताची शान, भारताला सुवर्णक्षणाचा साक्षीदार बनवणाऱ्या पी. व्ही. सिंधूला भेटून आनंद झाला. तिचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.'' (फोटो सौजन्य: एएनआय)
पी. व्ही सिंधू
क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी पी. व्ही सिंधूची भेट घेतली आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल तिचे कौतुक करत तिला १० लाख रुपयांचा धनादेश दिला. (फोटो सौजन्य: एएनआय)
पी. व्ही सिंधू
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी पी. व्ही सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू आहे. तिच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरु आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
पी. व्ही सिंधू
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूचे हे पाचवे पदक आहे. यापूर्वी तिने दोन रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकले आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)