पुढील बातमी

PHOTO: 'मॅन वर्सेस वाइल्ड' कार्यक्रमातील मोदींची सफर

लाइव्ह हिंदुस्थान, मुंबई
नरेंद्र मोदी आणि बेअर गिल्स
डिस्कव्हरी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम 'मॅन वर्सेस वाइल्ड'मध्ये लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बेअर गिल्सने याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. हा कार्यक्रम १२ ऑगस्टला प्रसारित होणार आहे. (फोटो सौजन्य - एएनआय)
नरेंद्र मोदी आणि बेअर गिल्स
बेअर ग्रिल्स याने ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट करत असे म्हटले आहे की, '१८० देशांतील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ती बाजू बघायला मिळेल, जी आतापर्यंत त्यांना माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मॅन वर्सेस वाईल्ड बघा १२ ऑगस्टला रात्री नऊ वाजता. (फोटो सौजन्य - एएनआय)
नरेंद्र मोदी आणि बेअर गिल्स
बेअर ग्रिल्सने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेअर ग्रिल्ससोबत जंगलात चालताना दिसत आहे. त्याच्यासोबत ते खूप गप्पा मारत आहेत. बेअरसोबत त्यांनी चालत, गाडीने, बोटीने देखील प्रवास केलेले व्हिडिओत पहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य - एएनआय)
नरेंद्र मोदी आणि बेअर गिल्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स भारताच्या सर्वात जुन्या 'जिम कार्बेट नॅशनल पार्क'मध्ये फिरताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य - एएनआय)
नरेंद्र मोदी आणि बेअर गिल्स
या आधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी ओबामा यांनी वन्यजीव, वातावरण बदल यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. (फोटो सौजन्य - एएनआय)
नरेंद्र मोदी आणि बेअर गिल्स
या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेअर ग्रिल्स आणि मोदी वन्यजीव, वातावरण बदल यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. (फोटो सौजन्य - एएनआय)
नरेंद्र मोदी आणि बेअर गिल्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी या कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, केट विंस्लेट, रोजर फेडरर, जूलिया रॉबर्ट्स हे दिसले होते.