पुढील बातमी

एंजेला मर्केल-पंतप्रधान मोदींची भेट यशस्वी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान मोदी-एंजेला मर्केल यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांच्यातील चर्चेनंतर भारत, जर्मनीने पाच संयुक्त आशय पत्रावर (जॉईंट डिक्लरेशन ऑफ इंटेंट) स्वाक्षरी केली. (PTI Photo)
मर्केल यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
मर्केल यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. अनेक क्षेत्रात दोन्ही देशांना एकत्रित काम करायचे असल्याचे त्या म्हणाल्या. (PTI Photo)
भारतात व्यापार करण्यासाठी जर्मनीमधील एक शिष्टमंडळ आपल्याबरोबर आल्याचे मर्केल यांनी सांगितले.
भारतात व्यापार करण्यासाठी जर्मनीमधील एक शिष्टमंडळ आपल्याबरोबर आल्याचे मर्केल यांनी सांगितले. (PTI Photo)
त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
नवी दिल्ली मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताला आधुनिक औद्योगिक राष्ट्र करण्यासाठी गंभीर असल्याचे मर्केल यांनी सांगितले. त्याचबरोबर आमचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले, त्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. (PTI Photo)
उभयदेशांमध्ये अंतराळ, नागरी विमान वाहतूक, औषधनिर्माण, शिक्षण या क्षेत्रांमध्ये ११ सहकार्य करार  झाले
एँजेला मर्केल यांच्याशी चर्चा झाल्यावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी एकूण पाच संयुक्त निवेदने यावेळी जाहीर केली. त्याचबरोबर उभयदेशांमध्ये अंतराळ, नागरी विमान वाहतूक, औषधनिर्माण, शिक्षण या क्षेत्रांमध्ये एकूण ११ सहकार्य करार यावेळी करण्यात आले. (PTI Photo)
एँजेला मर्केल म्हणाल्या, जर्मनीमध्ये सध्या २० हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
एँजेला मर्केल म्हणाल्या, जर्मनीमध्ये सध्या २० हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी जर्मनीमध्ये यावे अशी आमची इच्छा आहे. दोन्ही देशांमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षकांचेही आदान-प्रदान व्हावे, असेही आम्हाला वाटते.(PTI Photo)