पुढील बातमी

Photos : घरी राहा, निरोगी राहा!

HT मराठी टीम, मुंबई
घरी राहा, निरोगी राहा!
नेहमीच घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई कोरोनामुळे थांबली आहे. मुंबईकर घरीच थांबून जनता संचारबंदी पाळत आहेत. (Anshuman Poyrekar/Hindustan Times)
घरी राहा, निरोगी राहा!
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात जनता संचारबंदीला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. (Waseem Andrabi/Hindustan Times)
घरी राहा, निरोगी राहा!
करोना विषाणूचे देशावर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. (Waseem Andrabi/Hindustan Times)
घरी राहा, निरोगी राहा!
आज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंतं भारताच्या तमाम जनतेला 'जनता कर्फ्यू' म्हणजेच संचारबंदी पाळून देश कोरोना विषाणूमुक्त होण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्यायचं आहे.(Vipin Kumar/Vipin Kumar)
घरी राहा, निरोगी राहा!
देशाच्या कानाकोपऱ्यातून या 'जनता कर्फ्यू'ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
घरी राहा, निरोगी राहा!
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे.