पुढील बातमी

PHOTOS: हिमाचल प्रदेशमध्ये पसरली बर्फाची चादर

लाईव्ह हिंदुस्थान , दिल्ली
बर्फवृष्टी
हिमाचल प्रदेशमधील सर्वात जास्त लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या मनाली आणि शिमलामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे.(फोटो सौजन्य: पीटीआय)
बर्फवृष्टी
पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली आहे.(फोटो सौजन्य: पीटीआय)
बर्फवृष्टी
बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मनाली आणि शिमलामध्ये हॉटेल बुकिंगला सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
बर्फवृष्टी
लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या धर्मशाळा आणि पालमपूर येथे देखील बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
बर्फवृष्टी
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून उंचीवर असलेल्या किन्नौर, लाहौल आणि स्पीती, शिमला, कुल्लू, सिरमौर आणि चंबा जिल्ह्यात बर्फवृष्टी होत आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
बर्फवृष्टी
लाहौल और स्पीती जिल्ह्यातील प्रमुख शहर केलांगचे तापमान ० ते ५.९ डिग्री सेल्सियसच्या दरम्यान आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
बर्फवृष्टी
किन्नौर जिल्ह्यातील कल्पा शहराचे तापमान ० ते ४.४ डिग्री सेल्सिअस आणि धर्मशाळाचे तापमान ० ते ५.८ डिग्री सेल्सिअस ऐवढे आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)