पुढील बातमी

PHOTOS: उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पसरली बर्फाची चादर

HT मराठी टीम , हिमाचल प्रदेश
बर्फवृष्टी
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हवामान बदलानंतर जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. बर्फवृष्टीमुळे सगळीकडे सफेद चादर पसरली आहे. (ANI Photo)
बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. (ANI Photo)
बर्फवृष्टी
हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे येथील रस्ते तसेच महामार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी गाड्या उभ्या आहेत. (ANI Photo)
बर्फवृष्टी
बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यामुळे हिमाचल प्रदेशसह उत्तराखंडमधील अनेक पर्यटनस्थळी पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. (ANI Photo)
बर्फवृष्टी
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह गढवाल आणि कुमाऊं मंडल येथे जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. (PTI Photo)
बर्फवृष्टी
येत्या ४८ तासामध्ये अशीच बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (ANI Photo)
बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमुळे शुक्रवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (PTI Photo)