पुढील बातमी

PHOTOS : मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी

HT मराठी टीम , मुंबई
मुंबई पाऊस
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते. तो मुसळधार पाऊस अखेर सुरु झाला आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मुंबई पाऊस
शुक्रवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.(छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मुंबई पाऊस
हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मुंबई पाऊस
जून महिना संपायला आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मुंबई पाऊस
शुक्रवार सकाळपासूनच मुंबईची उपनगरे कांदिवली, बोरिवली, मुलुंड, घाटकोपर या भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मुंबई पाऊस
मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मुंबई पाऊस
वाशी टोलनाक्यावरदेखील वाहतुकीची कोंडी झाली आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मुंबई पाऊस
मुंबईच्या सखल भागातही मुसळधार पावसामुळे पाणी साचायला सुरूवात झाली आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )