पुढील बातमी

PHOTOS : जगभरातले हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

HT मराठी टीम, मुंबई
फोटो
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान एका कॅमेरामॅनच्या कॅमेरावर पिटुकला पक्षी येऊन बसला. हे मजेशीर दृश्य कॅमेरात कैद झालंय REUTERS/Toby Melville
फोटो
ब्रेक्झिटची कोंडी सोडण्यास असमर्थ ठरल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. (छाया सौजन्य : REUTERS/Toby Melville)
अमित शहा नरेंद्र मोदी
लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने गुरुवारी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर मोदींनी गुरूवारी देशवासीयांचे आभार मानले. (PTI Photo)
दिल्ली
राजधानी दिल्लीत पावसाचा हलक्या सरी कोसळल्या. राजधानी दिल्लीत सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत यातून काहीसा दिलासा दिल्लीकरांना मिळाला. (PTI Photo)
जाकीर मुसा
काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपूर्णपणे नष्ट करण्याच्या अभियानात गुंतलेल्या सुरक्षादलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे सैन्यदलाने मोस्ट वाँटेड दहशतवादी जाकीर मुसाला कंठस्नान घातले आहे. (PTI Photo/S. Irfan)
विराट कोहली
येत्या ३० मे पासून क्रिकेटच्या विश्वचषकाला सुरूवात होत आहे भारतीय संघ या आठवड्याच्या सुरूवातीला इंग्लडला पोहोचला. कर्णधार विराट कोहली लंडनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना. (Andrew Boyers/Pool Photo via AP)