पुढील बातमी

PHOTO: दिल्लीमध्ये ४० वर्षातील सर्वात मोठा पूर येण्याची भिती

लाईव्ह हिंदुस्थान, दिल्ली
दिल्ली यमुना नदी पूर
यमुना नदीला पूर आल्यामुळे दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यमुना नदीकाठी राहणारे नागरिक त्यांचे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. फरिदाबादच्या बसंतपूर कॉलनीमधील अनेक नागरिकांनी घरं खाली करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य: संचित खन्ना/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली यमुना नदी पूर
प्रशासनाने सांगितल्यानंतर देखील याठिकाणी राहणारे नागरिक सोमवारी रात्रभर आपले घर सोडण्यास तयार नव्हते. मात्र पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्व नागरिक घर सोडून सुरक्षित स्थळी गेले. दिल्ली प्रशासनाकडून यापूर्वीच अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे नुकसान झाले नाही. (फोटो सौजन्य: संचित खन्ना/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली यमुना नदी पूर
फरिदाबादमधील याच कॉलनीमध्ये सर्वात आधी पाणी शिरले. ही कॉलनी यमुना नदीच्याकाठी वसली आहे. याठिकाणी जवळपास 20 हजारांपेक्षा जास्त लोकं राहतात. सोमवारी संध्याकाळनंतर यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. (फोटो सौजन्य: संचित खन्ना/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली यमुना नदी पूर
हथिनीकुंड बैराजमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे यमुना नदीला पूर आला आहे. दिल्लीमध्ये 40 वर्षातील सर्वात मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (फोटो सौजन्य: संचित खन्ना/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली यमुना नदी पूर
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांसोबत सोमवारी तातडीची बैठक घेतली. यमुना नदीकाठी राहणाऱ्या 24 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले होते. (फोटो सौजन्य: संचित खन्ना/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली यमुना नदी पूर
यमुना नदीला आलेल्याच पूराचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी दिल्ली सरकारने 2100 छावण्यांमध्ये व्यवस्था केली आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये पूराचा सर्वात जास्त फटका मंगळवार रात्रीपासून ते बुधवार सकाळपर्यंत बसणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांना अलर्ट देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: संचित खन्ना/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्लीत यमुना नदीला पूर
दिल्ली पोलिस आणि नागरी सुरक्षा स्वयंसेवकांना लोकांना मदत करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच पूराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. (फोटो सौजन्य: संचित खन्ना/ हिंदुस्थान टाइम्स)