पुढील बातमी

PHOTOS: न्यूझीलंडच्या व्हाइट बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक

HT मराठी टीम , दिल्ली
न्यूझीलंड ज्वालामुखी
न्यूझीलंडमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेल्या व्हाइट बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. (Photo-AP)
न्यूझीलंड ज्वालामुखी
ज्वालामुखीच्या उद्रेकात ६ जणांचा मृत्यू तर ५५ जण जखमी झाले आहेत. तर ८ जण बेपत्ता आहेत. (Photo-AP)
न्यूझीलंड ज्वालामुखी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात वेगवेगळ्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. यातील २५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. (Photo-AFP)
न्यूझीलंड ज्वालामुखी
बेपत्ता झालेले पर्यटक जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेपत्तामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, यूके, चीन आणि मलेशिया येथील पर्यटकांचा समावेश आहे. त्याच्यासोबत न्यूझीलंडचा मार्गदर्शक होता. (Photo-REUTERS)
न्यूझीलंड ज्वालामुखी
न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. (Photo-AP)
न्यूझीलंड ज्वालामुखी
व्हाईट बेटावर शोध मोहिम आणि बचावकार्य सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Photo-AFP)
न्यूझीलंड ज्वालामुखी
न्यूझीलंडच्या ऑकलॅण्ड रुग्णालयात मंगळवारी संध्याकाळी एका जखमीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. (Photo-AFP)
न्यूझीलंड ज्वालामुखी
न्यूझीलंडच्या व्हाइट बेटावर सोमवारी ९ डिसेंबर रोजी अचानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. (Photo-REUTERS)