पुढील बातमी

PHOTO: कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती गंभीर

HT मराठी टीम , कोल्हापूर
सांगली महापूर
सांगलीमध्ये कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कृष्णा नदीला आलेल्या महापूराचे पाणी शहरामध्ये शिरले आहे. सांगली शहराचा काही भाग पाण्याखाली गेला असून जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे.
कोल्हापूर महापूर
कोल्हापूरला देखील पूराचा फटका बसला आहे. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहरांमध्ये आणि काही गावांमध्ये पूराचे पाणी शिरले आहे.
कोल्हापूर महापूर
पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफची टीम बोटीच्या सहाय्याने बचावकार्य करत आहे. (छाया सौजन्य - एएनआय)
कोल्हापूर, सांगली पूर
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये महापूर आला आहे. पूरामध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
नौदलाची टीम
कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाची टीम रवाना झाली आहे. (छाया सौजन्य - एएनआय)
कोल्हापूर पूर
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलेल्या लष्कराच्या जवानांना आणि पूरग्रस्तांना स्थानिक नागरिकांकडून जेवण दिले जात आहे.