पुढील बातमी

Photos : दुसरी निर्भया का हवी? जंतर-मंतरवर निदर्शनं

HT मराठी टीम, नवी दिल्ली
 हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर निदर्शने
तेलंगणा येथील हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्गातील लोक एकत्रित जमले होते. (PTI Photo)
काँग्रेस नेत्या अमृता धवन
काँग्रेस नेत्या अमृता धवन म्हणाल्या की, मी एक नेता म्हणून नाही तर समाजातील एक सदस्य म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे. (PTI Photo)
महिला किती असुरक्षित आहेत यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला दुसरी निर्भया का हवी?
महिला किती असुरक्षित आहेत यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला दुसरी निर्भया का हवी? पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलायला हवीत, असा सूर यावेळी उमटल्याचे पाहायला मिळाले. (REUTERS Photo)
निर्भया प्रकरणातील आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही.
निर्भया प्रकरणातील आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही. पीडितेच्या कुटुंबियांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही, असे सांगत अमृता धवन यांनी अशा घटनांमध्ये कठोर आणि त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. (PTI Photo)
फलकबाजी करत महिलांनी पीडितेला न्याय द्या, अशी घोषणाबाजी केली (PTI Photo)
गुरुवारी हैदराबादमधील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्याच्या घटनेनं देश सून्न झाला आहे.