पुढील बातमी

PHOTOS: गेट वे ऑफ इंडियावर नौदल दिन उत्साहात साजरा

HT मराठी टीम , मुंबई
नौदल दिवस
४ डिसेंबर १९७१ या दिवशी कराची बंदरावर भारतीय युद्धनौकांनी निर्णायक यशस्वी हल्ला केला होता. त्या निमिताने ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो सौजन्य: एएफपी)
नौदल दिवस
४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडिया' येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (फोटो सौजन्य: एएनआय)
नौदल दिवस
नौदल दिनानिमित्त गेट ऑफ इंडियाला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. (फोटो सौजन्य: पीटीआय)
नौदल दिवस
या सोहळ्यात नौदलाच्या जवानांनी आपले पराक्रम आणि धैर्य दाखवून दिले. (फोटो सौजन्य: पीटीआय)
नौदल दिवस
मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथे बिटिंग द रिट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (फोटो सौजन्य: पीटीआय)
नौदल दिवस
नौदल कमांडोंनी विविध प्रात्यक्षिके केली. हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. (फोटो सौजन्य: पीटीआय)
नौदल दिवस
नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या जवानांनी आपले कौशल्य दाखविले. (फोटो सौजन्य: पीटीआय)
नौदल दिवस
नौदल कमांडोंनीही विविध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. (फोटो सौजन्य: पीटीआय)