पुढील बातमी

PHOTOS : मुंबईला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं

HT मराठी टीम , मुंबई
मुंबई पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरांत मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (छाया सौजन्य : विजयानंद गुप्ता / हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
मुंबईमध्ये येते दोन ते तीन मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे (छाया सौजन्य : विजयानंद गुप्ता / हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे सायन, कुर्ला, हिंदमाता या भागातील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (छाया सौजन्य : विजयानंद गुप्ता / हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर रुळांवरही पाणी साचलं आहे (छाया सौजन्य : विजयानंद गुप्ता / हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
रुळांवर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला आहे. (छाया सौजन्य : विजयानंद गुप्ता / हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
विविध ठिकाणी पाणी साचल्याने बेस्टने ४५ मार्गांवरील वाहतूक इतर दिशेने वळविली आहे. (छाया सौजन्य : विजयानंद गुप्ता / हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स)
मुंबई पाऊस
पावसामुळे अनेक जण साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत जात आहेत (छाया सौजन्य : विजयानंद गुप्ता / हिंदुस्थान टाइम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mumbai rain live update water logging on Railway track And others area