पुढील बातमी

PHOTOS : अशी होते केसराची शेती

HT मराठी टीम , मुंबई
अशी होते केसराची शेती
जगभरात केसरला मोठी मागणी आहे. अत्यंत महाग असणाऱ्या केसरची जगातील काही मोजक्याच देशात लागवड केली जाते. (छाया सौजन्य : AP)
अशी होते केसराची शेती
केसराचं सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या पाच देशापैंकी मोरोक्को हा एक देश आहे. (छाया सौजन्य : AP)
अशी होते केसराची शेती
इथे अनेकांचा उदरनिर्वाह हा केसराच्या शेतीवर चालतो. गेल्यावर्षी ६.८ टन केसराचं उत्पन्न या देशानं घेतलं होतं. (छाया सौजन्य : AP)
अशी होते केसराची शेती
पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत समोर अधुंक दिसत असताना केसरची फुलं खुडण्याचं काम सुरू होते. (छाया सौजन्य : AP)
अशी होते केसराची शेती
पहाटे उठून केसरची फुलं खुडली जातात. त्यानंतर लगेच फुलांतून केसर वेगळं केलं जातं. (छाया सौजन्य : AP)
अशी होते केसराची शेती
फुलं खुडल्यापासून काही तासांच्या आत केसर वेगळं करून ते सुकवलं नाही तर केसरचा दर्जा कमी होतो. (छाया सौजन्य : AP)
अशी होते केसराची शेती
मोरोक्कोच्या अटलास पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या अश्काऊन गावातील अनेकांचा उदरनिर्वाह केसर शेतीवर होतो. (छाया सौजन्य : AP)