पुढील बातमी

Photos Of The Week : जकार्तापासून ते जपानपर्यंत या आठवड्यातील फोटोसैर

HT मराठी टीम, मुंबई
जपान
जपान: टोकियोमधील ही दृश्य आहेत. एका शॉपिंग मॉलचा संपूर्ण प्रवेशद्वार काचांनी सजवण्यात आला आहे. (AP Photo/Jae C. Hong)
मोरोक्को
मोरोक्को : युनेस्कोद्वारे जागतिक वारशाचा दर्जा लाभलेल्या Medina of Fez मध्ये पर्यटनाचा आनंद घेणारे पर्यटक (AP Photo/Mosa'ab Elshamy)
दिल्ली
दिल्ली : सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा पारा चढला आहे यामुळे दिल्लीकरच नाहीतर हे पक्षीदेखील हैराण आहेत. उन्हापासून शरीर थंड ठेवण्यासाठी कांरज्यात आंघोळ करणारी मैना (Atul Yadav/PTI Photo)
थेरेसा मे
ब्रेक्झिटची कोंडी सोडण्यास असमर्थ ठरल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्या सभागृहातून निघून गेल्या . (AP Photo/Alastair Grant)
जकार्ता
जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. राष्ट्रपती जोको विडोडो यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये वाद झाला याचदरम्यान फटाक्यांचा स्फोटही झाला. (AP/PTI)
काश्मिर
काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपूर्णपणे नष्ट करण्याच्या अभियानात गुंतलेल्या सुरक्षादलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे सैन्यदलाने मोस्ट वाँटेड दहशतवादी जाकीर मुसाला कंठस्नान घातले आहे. यानंतर गावकरी घटनास्थळी आले (AP Photo/ Dar Yasin)