पुढील बातमी

Maruti S-pressoची किंमत ३,६९ लाखांपासून सुरु, जाणून घ्या वैशिष्ट्ये

HT मराठी टीम, मुंबई
किंमत कमी असल्यामुळेही लोकांना या कारचे आकर्षण आहे.
Maruti suzuki S-Presso भारतात लाँच झाल्यानंतर लोकांमध्ये या कारबाबत जाणून घेण्यासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः याची किंमत कमी असल्यामुळेही लोकांना या कारचे आकर्षण आहे. (Photo-Maruti Suzuki)
मारूती एस प्रेसोची सुरुवातीची किंमत ३.६९ लाख रुपयांपासून आहे.
मारुतीची ही सर्वांत स्वस्त एसयूव्ही असेल असे मानले जात होते. हा अंदाज खरा ठरला. मारूती एस प्रेसोची सुरुवातीची किंमत ३.६९ लाख रुपयांपासून आहे. सध्या पेट्रोल इंजिनची कार बाजारात उतरवण्यात आली आहे. (Photo-Maruti Suzuki)
मारुती एस प्रेसो ५ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Standard, LXI, VXI, and VXI+ समावेश आहे.
मारुती एस प्रेसो ५ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Standard, LXI, VXI, and VXI+ समावेश आहे. कारमध्ये १० हून अधिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहे. मारुतीच्या छोट्या एसयूव्हीच्या स्पर्धेत रेनॉ क्विड असेल. (Photo-Maruti Suzuki)
या कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत ४.९१ लाख रुपये आहे.
मारुती एस प्रेसोची सुरुवातीची किंमत ३.६९ लाख असेल. या कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत ४.९१ लाख रुपये आहे. (Photo-Maruti Suzuki)
मारुती एस प्रेसोमध्ये १.० ३ सिलिंडर बीएस ६ पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
मारुती एस प्रेसोमध्ये १.० ३ सिलिंडर बीएस ६ पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये इंजिनबरोबर ५ स्पीड मॅन्यूएल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. साईजचा विचार केला तर ही कार रेनो क्विडपेक्षा उंच आहे. याची लांबी, रुंदी व्हिलबेसनुसार ही क्विडपेक्षा छोटी असेल. (Photo-Maruti Suzuki)
यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि सेंट्रल इन्सट्रूमेंट क्लस्टरसारखे फिचर्स मिळणार.
यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि सेंट्रल इन्सट्रूमेंट क्लस्टरसारखे (ऑरेंज बॅकलायटिंगसह) फिचर्स मिळणार. (Photo-Maruti Suzuki)
यामध्ये २७ लीटरची इंधनाची टाकी देण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी या कारमध्ये एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर, हायस्पीड अलर्ट, फ्रंट सीटबेल्ट प्रिटेंशनर आणि लोड लिमिटरसारखे फिचर्स मिळतील. यामध्ये ५ लोक बसू शकतील. २७ लीटरची इंधनाची टाकी देण्यात आली आहे. (Photo-Maruti Suzuki)