पुढील बातमी

चौकीदार चोर है ते चौकीदार साथ है!

वृत्तसंस्था, लातूर
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र
भाजपसोबत सत्तेत राहून त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेने सोडली नाही. विरोधकांसोबतच शिवसेनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौकीदार चोर है अशी टीका केली होती. त्याच पक्षासोबत निवडणूकपूर्व आघाडीही शिवसेनेने केली. आता प्रचारासाठी नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातूरमध्ये एकत्र आले होते.
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र
मराठवाड्यातील लातूरमध्ये नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. (ANI Photo)
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र
लातूरमध्ये औसा येथे झालेल्या जाहीर सभेवेळी नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आपले लहान बंधू आहेत, असेही सांगितले. (ANI Photo)
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र
लातूरमधील सभेत नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. (ANI Photo)
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र
मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याच्या जलपूजेसाठी नरेंद्र मोदी २४ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईत आले होते. त्यावेळी त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. (ANI Photo)
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र
मराठवाडा जरी मागास असला, तरी येथील लोकांची महत्त्वाकांक्षा व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. (ANI Photo)
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून गेल्या पाच वर्षांत सातत्याने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. (ANI Photo)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 narendra modi and uddhav thackeray during an election rally in latur