चौथ्या टप्प्यात आज (सोमवार) ९ राज्यांच्या ७१ जागांवर मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रात सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. (छाया सौजन्य : Anshuman poyrekar)
2/7
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. आतापर्यंत घाटकोपर पूर्व इथे सर्वाधिक मतदान झालेलं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य : Aalok Soni)
3/7
चर्चगेटमधल्या जय हिंद कॉलेज इथलं 'सखी पोलिंग बुथ' . या मतदान केंद्रावरील सर्व कामकाज या महिला पाहत आहेत. (छाया सौजन्य : Anshuman poyrekar)
4/7
अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी मतदानाचा हक्क बजावला. (छाया सौजन्य : Prodip Guha)
5/7
काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी अंधेरी येथे कुटुंबीयांसह मतदानासाठी उपस्थीती लावली. (छाया सौजन्य : Satyabrata Tripathy)
6/7
तरुण, सेलिब्रिटींसोबत अनेक ज्येष्ठ नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावला. १०१ वर्षीय घाटकोपर पूर्व इथले रहिवासी धानजी भाई दास हे देखील आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. (छाया सौजन्य : Aalok Soni)
7/7
उद्योगपती अनिल अंबानी यांनीदेखील कफ परेड येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. (छाया सौजन्य : Anshuman poyrekar)