पुढील बातमी

कोरोनाशी लढा : आतापर्यंत 'या' कलाकारांनी देशासाठी केली सढळहस्ते मदत

HT मराठी टीम, मुंबई
अक्षय कुमार- मोदी
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं सर्वप्रथम पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २५ कोटी इतकी मोठी रक्कम मदत म्हणून पीएम केअर फंडला दिली आहे.
सलमान खान
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या चित्रपट विश्वातल्या २५ हजार रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करण्याची जबाबदारी सलमाननं घेतली आहे.
सोनाली कुलकर्णी
सोनालीनं मात्र मदत निधीची रक्कम जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्तिक आर्यन
अभिनेता कार्तिक आर्यननं पीएम केअर फंडला १ कोटींचा निधी दिला आहे.
विराट- अनुष्का
विराट- अनुष्कानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
लतादीदी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील कोरोनाविरोधात लढाईसाठी आपला खारीचा वाटा उचलला आहे. लतादीदींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांची मदत देऊ केली आहे.
विकी कौशल
अभिनेता विकी कौशल यानं १ कोटींची मदत जाहीर केली आहे.
आलिया भट्ट
आलिया भट्ट हिनं देखील दोन्ही ठिकाणी निधी दिला आहे तिनं सोशल मीडियावरुन ही माहिती दिली.
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीनं २१ लाखांची मदत जाहीर केली आहे.
सारा- कार्तिकची कूल जोडी
अभिनेत्री सारा अली खान हिनं देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पीएम केअर फंडला निधी दिला आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:list of bollyood star who donates Chief Ministers Relief Fund and PM Cares Fund to fight COVID19