पुढील बातमी

PHOTO: कोल्हापूर जलमय; बचावकार्य युध्दपातळीवर

HT मराठी टीम , कोल्हापूर
कोल्हापूर पूर
संपूर्ण कोल्हापूर शहराला पूराच्या पाण्याने विळखा घातला आहे. कोल्हापूर शहरातील घरं, इमारती, बाजारपेठा, पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)
कोल्हापूर पूर
पूरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी गाड्या थांबल्या आहेत. लांबपर्यंत ना रस्ते, ना घरं दिसत आहे. संपूर्ण कोल्हापूर जलमय झाले आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)
कोल्हापूर पूर
कोल्हापूर शहराच्या मध्यभागापर्यंत पूराचे पाणी आले आहे. रस्ते आहेत की नदी हेच काही कळेना. स्थानिकांच्या घरामध्ये पूराचे पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)
कोल्हापूर पूर
एनडीआरएफच्या जवानांकडून पूरामध्ये अडकलेल्या महिला, लहान मुलं, वयोवृध्द यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)
कोल्हापूर पूर
पूरामध्ये अडकलेल्या आजींची एनडीआरएफच्या जवानांनी सुटका केली. त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)
कोल्हापूर पूर
कोल्हापूरच्या महापूराने रुद्रावतार धारण केला आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पूरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)